जाफराबाद: गावात झालेल्या भ्रष्टाचाराचा विरोधात तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप सावरगाव मस्के येथील प्रकार
आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव मस्के येथील शेकडो तरुणांनी एकत्र येत गावात झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयामधील भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकली आहे कारण मागील काही वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत गावात कामे केल्याची चर्चा आहे मात्र कामे कुठेही झाली नाही त्यामुळे शासनाचा व जनतेचा पैसा हडप करण्यात आल्याचा आरोप करत या तरुणांनी ग्रामपंचायतला ठोकत कारवाईची मागणी केली आहे.