रामटेक: नगरधन येथील ओंकारा राईस मिल मध्ये तीन मजुरांचा शेततलावात बुडून करुण अंत
Ramtek, Nagpur | Sep 26, 2026 रामटेक नगरधन मार्गावरील मोहनलाल शंकरलाल ऍग्रो फुड्स नगरधन लगतच्या ओंकारा राईस मिल येथील तीन कंत्राटी मजुरांचा शनिवार दिनांक 26 सप्टेंबरला दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास परिसरातील शेततलावात बुडून करून अंत झाला. तिघेही बिहार राज्याचे युवक होते. मृतकांचे नाव गुलशन कुमार वय 20 वर्षे रा. पूर्णिया,रुपेश कुमार वय 18 वर्षे रा. खगरिया व मनीष कुमार वय 18 वर्षे रा. पूर्णिया बिहार असे आहे.