कळमेश्वर: पंचायत समिती कळमेश्वर तर्फे तिरंगा बाईक रॅली चे आयोजन
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी पंचायत समिती कळमेश्वर तर्फे तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅली पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला हातात तिरंगा ध्वज घेऊन दुचाकीवरून सहभागी झालेल्या नागरिकांनी परिसरात देशभक्तीचा संदेश दिला रॅली दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला