ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाची नवी दारे; लोढा स्किल सेंटरची पहिली २२० विद्यार्थ्यांची बॅच पूर्ण
डोंबिवली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या **डॉ. गोळवलकर गुरुजी अध्ययन केंद्र (लोढा स्किल सेंटर)**ची पहिली २२० विद्यार्थ्यांची बॅच नुकतीच पूर्ण झाली.
ग्रामीण भागातील अनेक तरुण-तरुणींमध्ये कौशल्य आणि क्षमता असूनही योग्य प्रशिक्षणाच्या संधींचा अभाव जाणवतो. ही बाब लक्षात घेऊन गुलाब वझे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
लोढा स्किल सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. पहिल्या बॅचमधील २२० विद्यार्थ्या�
Kalyan, Thane | Oct 3, 2026