कळमेश्वर: दहेगाव च्या शुभम घोटे यांची यूपीएससी परीक्षेत दमदार कामगिरी
कळमेश्वर तालुक्यातील देहगाव येथील कु. शुभम दिलीप घोटे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC परीक्षेच्या निकालात ऑल इंडिया रँक (AIR) 39 मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे देहगावसह संपूर्ण कळमेश्वर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शुभम घोटे यांची Assistant Commandant, CISF या पदावर निवड झाली आहे.