पुण्यात रेस्टॉरंटच्या जेवणात अळी? ग्राहकाचा VIDEO व्हायरल; अन्नसुरक्षेवर प्रश्नचिन्ह
पुण्यातील वारजे भागातील आम्रपाली फॅमिली रेस्टो अँड बारमध्ये जेवणात अळी आढळल्याचा ग्राहकाने आरोप केला आहे. ग्राहकाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये वाढलेल्या पदार्थात एक जिवंत अळी सरपटताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्राहकाने रेस्टॉरंटमधील कर्मचारी आणि व्यवस्थापनाशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. या कथित प्रकारामुळे परिसरातील खाद्यपदार्थांच्या स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या मानकांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, स्थानिक रहिवासी आणि अन्नसुरक्षा कार्यकर्त्यांनी FDAने या प्रकरणाची तातडीने तपासणी करावी, तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणातील रेस्टॉरंट व्यवस्थापनाची अधिकृत बाजू आणि FDAची कारवाई याबाबतची माहिती समोर येणे बाकी आहे.
🚨 जेवणात अळी आढळल्याचा ग्राहकाचा आरोप!
😱 वारजे रेस्टॉरंटचा VIDEO व्हायरल
⚠️ अन्नसुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
🔎 FDA तपासणीची मागणी; VIDEO चर्चेत
#Pune #Warje #PuneNews #FoodSafety #FoodSafetyViolation #Restaurant #AmrapaliRestaurant #FDA #ViralVideo #MaharashtraNews #BreakingNews