Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

कर्जत: माथेरान, पनवेलमध्ये सर्वाधिक पाऊस; २४ तासांत सरासरी १२२.८३ मिमीची नोंद

Karjat, Raigad | Jul 2, 2026
रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला असून, आज (२ जुलै) सकाळी ९.०० वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण १९६५.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची आजची २४ तासांची सरासरी १२२.८३ मिमी इतकी असून बहुतांश तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील पाऊसाचा आढावा घेतला असता, पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान आणि पनवेल परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. माथेरानमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक २०८ मिमी, तर पनवेलमध्ये १९१.४ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल कर्जत तालुक्यात १५२ मिमी, श्रीवर्धनमध्ये १३९ मिमी, म्हसळयात १३८ मिमी आणि जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये १३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

MORE NEWS