रामटेक: रामटेक येथे भाजपा महिला आघाडी तर्फे निघाला मूक मोर्चा
Ramtek, Nagpur | Aug 14, 2026 14 ऑगस्ट ला सायंकाळी साडेपाच वाजता च्या दरम्यान भाजपा महिला मोर्चा नागपूरच्या वतीने रामटेक येथे विभाजन विभूषिका स्मृतिदिनानिमित्त मूक मोर्चा काढण्यात आला. किराड भवन गांधी चौक रामटेक येथील माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून हा मोर्चा निघून गांधी चौक, नेहरू चौक होत हुतात्मा स्मारक परिसर रामटेक येथे पोहोचला. येथे देशाच्या स्वातंत्र्य युद्धात हुतात्मा पत्करण्यास शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली.