Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

सर्वसामान्यांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा द्या : माजी मंत्री आ. संजय बनसोडे महाआरोग्य शिबीराचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा उदगीर : माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महा आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे मत माजी मंत्री तथा आमदार आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. उदगीर येथील सामान्य रुग्णालयात आयोजीत माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य शिबीरा प्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड.व्यंकट बेद्रे, माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जि.प. चे बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिरादार,जि. प. सदस्य तथा गटनेते प्रा. दिलीप मटके, मुकेश भालेराव, यमुनाजी भुजबळे, रामराव राठोड, उपनगराध्यक्षा सौ.शितल शिंदे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, उपसभापती विक्की भोसले, न.प. चे गटनेते अनिल मुदाळे, बांधकाम सभापती राजकुमार भालेराव, नगरसेवक बाळासाहेब पाटोदे, शिवकुमार कांबळे, अॅड.वर्षा कांबळे, डाॅ.बालाजी बिरादार, समीर शेख, अमर सुर्यवंशी, नरसिंग शिंदे, व्यंकट बोईनवाड, धनाजी मुळे, इब्राहिम नाना पटेल, अरविंद गिलचे, नवनाथ गायकवाड, पं.स. गटनेते प्रकाश बिरादार, कमलाकर फुले, प्रकाश राठोड, संदिप बिरादार, शफी हाशमी, शंकर रोडगे, पृथ्वीराज पाटील, उर्मिला वाघमारे, वैशाली कांबळे, हुस्ना बानो, शुभम भुमणे, बाबासाहेब सुर्यवंशी, राजु पाटील, सिमा नेत्रगावकर, डाॅ.सुमित होळीकर, डाॅ.सचिन जाधव, डाॅ.पांडुरंग होळीकर, डाॅ.अशोक सारडा, डाॅ.सुमित वाघमारे, डाॅ.सुनिल भागवत, डाॅ.स्वाती सोनवणे, डाॅ.शशिकांत देशपांडे, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. संजय बनसोडे म्हणाले की, स्व.अजितदादा पवार यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्याचे कार्य केले. त्याच प्रेरणेतून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या महा आरोग्य शिबिरातून हजारो नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि आवश्यक उपचारांचा लाभ मिळत आहे. उदगीर हे तीन राज्याच्या सिमेवर असलेले शहर असुन येथे लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात असुन २०० खाटांचे सामान्य रुग्णालय आता ३०० खाटांचे करावे आणि स्वतंत्र १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याची मागणी मी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, नेत्रतपासणी, महिला व बालरोग, कान, नाक घसा तज्ञ, अस्थिरोग तसेच इतर विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. गरजू रुग्णांना आवश्यक औषधांचे वाटप व पुढील उपचारांसाठी तज्ज्ञांकडे मार्गदर्शन करण्यात आले. माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी नागरिकांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देत, आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक कुटुंबाने निरोगी जीवन जगावे, असेही आ.संजय बनसोडे यांनी सांगितले. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे महा आरोग्य शिबिर सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.श्याम डावळे यांनी केले तर आभार अनिल मुदाळे यांनी मानले. या महा आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक, वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Latur, Latur | Jul 27, 2026

MORE NEWS

भाजप युवा मोर्चा चे गांधी चौक यथे आंदोलन

भाजप युवा मोर्चा चे गांधी चौक यथे आंदोलन

Latur, Latur | Aug 16, 2026

लातूर : लातूर शहरातील खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरलेले संजय आईस बार व सुखसागर फास्ट फूड आता नव्या दिमाखात ‘सुखसागर फूड्स – व्हेज नॉनव्हेज’ या नावाने लातूरकरांच्या सेवेत सुरू झाले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी सुखसागर फूड्सचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
१९७५ मध्ये सुरू झालेल्या संजय आईस बार व सुखसागर फास्ट फूडच्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाला आता नव्या रूपाची जोड मिळाली आहे. पाच दशकांपासून लातूरकरांना आपल्या पदार्थांची चव आणि सेवा देणाऱ्या संजय धुमाळ यांनी आता व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची विस्तृत मेजवानी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी सुखसागर फूड्सची सुरुवात केली आहे.
लातूर शहराची ओळख खवय्यांचे शहर म्हणून आहे. ‘जे जे नवं ते लातूरला हवं’ अशी लातूरची ओळख असताना, बदलत्या काळानुसार खाद्यप्रेमींच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. हीच गरज लक्षात घेऊन सुखसागर फूड्समध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसोबत अस्सल मराठमोळ्या चवीला विशेष स्थान देण्यात आले आहे.
संजय आईस बार आणि सुखसागर फास्ट फूडच्या माध्यमातून गेल्या ५० वर्षांत लातूरकरांशी निर्माण झालेला विश्वास आणि आपुलकी कायम ठेवत, त्याच चव आणि दर्जाच्या परंपरेला पुढे नेण्याचा प्रयत्न सुखसागर फूड्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या ग्राहकांसाठी परिचित चवीची आठवण आणि नव्या ग्राहकांसाठी नवे खाद्यआकर्षण, अशी दुहेरी मेजवानी येथे उपलब्ध होणार आहे.
आर्यन संजय धुमाळ यांच्या हस्ते फीत कापून सुखसागर फूड्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य याहिया कसेरी, नागेश आप्पा बावगे, रामेश्वरजी मालू, महेशजी सोमानी, शुभम दडगे, ओम तांदळे, ऋषिकेश हलगे, सोहम बुलशेटे यांच्यासह मित्रपरिवार, हितचिंतक आणि खाद्यप्रेमी उपस्थित होते.
पाच दशकांच्या खाद्यसेवेचा अनुभव, लातूरकरांचा विश्वास आणि व्हेज-नॉनव्हेज पदार्थांची नवी रेंज या जोरावर सुखसागर फूड्सने लातूरच्या खाद्यविश्वात नव्या रूपाने प्रवेश केला आहे. लातूरकरांच्या अस्सल चवीची भूक भागविण्यासाठी सुखसागर फूड्स किती लोकप्रिय ठरते, हे येणाऱ्या काळात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पत्ता : संजय आईस बार शेजारी, सुभाष चौक, रिगल टॉकीज, लातूर.

लातूर : लातूर शहरातील खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरलेले संजय आईस बार व सुखसागर फास्ट फूड आता नव्या दिमाखात ‘सुखसागर फूड्स – व्हेज नॉनव्हेज’ या नावाने लातूरकरांच्या सेवेत सुरू झाले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी सुखसागर फूड्सचे उद्घाटन उत्साहात पार पडले. १९७५ मध्ये सुरू झालेल्या संजय आईस बार व सुखसागर फास्ट फूडच्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाला आता नव्या रूपाची जोड मिळाली आहे. पाच दशकांपासून लातूरकरांना आपल्या पदार्थांची चव आणि सेवा देणाऱ्या संजय धुमाळ यांनी आता व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची विस्तृत मेजवानी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी सुखसागर फूड्सची सुरुवात केली आहे. लातूर शहराची ओळख खवय्यांचे शहर म्हणून आहे. ‘जे जे नवं ते लातूरला हवं’ अशी लातूरची ओळख असताना, बदलत्या काळानुसार खाद्यप्रेमींच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. हीच गरज लक्षात घेऊन सुखसागर फूड्समध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसोबत अस्सल मराठमोळ्या चवीला विशेष स्थान देण्यात आले आहे. संजय आईस बार आणि सुखसागर फास्ट फूडच्या माध्यमातून गेल्या ५० वर्षांत लातूरकरांशी निर्माण झालेला विश्वास आणि आपुलकी कायम ठेवत, त्याच चव आणि दर्जाच्या परंपरेला पुढे नेण्याचा प्रयत्न सुखसागर फूड्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या ग्राहकांसाठी परिचित चवीची आठवण आणि नव्या ग्राहकांसाठी नवे खाद्यआकर्षण, अशी दुहेरी मेजवानी येथे उपलब्ध होणार आहे. आर्यन संजय धुमाळ यांच्या हस्ते फीत कापून सुखसागर फूड्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य याहिया कसेरी, नागेश आप्पा बावगे, रामेश्वरजी मालू, महेशजी सोमानी, शुभम दडगे, ओम तांदळे, ऋषिकेश हलगे, सोहम बुलशेटे यांच्यासह मित्रपरिवार, हितचिंतक आणि खाद्यप्रेमी उपस्थित होते. पाच दशकांच्या खाद्यसेवेचा अनुभव, लातूरकरांचा विश्वास आणि व्हेज-नॉनव्हेज पदार्थांची नवी रेंज या जोरावर सुखसागर फूड्सने लातूरच्या खाद्यविश्वात नव्या रूपाने प्रवेश केला आहे. लातूरकरांच्या अस्सल चवीची भूक भागविण्यासाठी सुखसागर फूड्स किती लोकप्रिय ठरते, हे येणाऱ्या काळात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पत्ता : संजय आईस बार शेजारी, सुभाष चौक, रिगल टॉकीज, लातूर.

Latur, Latur | Aug 16, 2026

📍गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने दिनेश शिवलाल गिरी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने केले सन्मानित

लातूर : राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींना माध्यमाच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडत, तसेच समाजातील सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत सातत्याने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले महाराष्ट्र न्यूजचे चीफ एडिटर दिनेश शिवलाल गिरी यांना गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पत्रकारिता हे केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील अन्याय, अत्याचार आणि समस्यांना वाचा फोडण्याचे प्रभावी माध्यम आहे, या भूमिकेतून दिनेश गिरी सातत्याने कार्यरत आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडली आहे.

त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांनी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करून त्यांचा सन्मान केला. या पुरस्काराबद्दल दिनेश गिरी यांनी गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरचे आभार मानले असून, भविष्यातही अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

📍गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने दिनेश शिवलाल गिरी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने केले सन्मानित लातूर : राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींना माध्यमाच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडत, तसेच समाजातील सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत सातत्याने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले महाराष्ट्र न्यूजचे चीफ एडिटर दिनेश शिवलाल गिरी यांना गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता हे केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील अन्याय, अत्याचार आणि समस्यांना वाचा फोडण्याचे प्रभावी माध्यम आहे, या भूमिकेतून दिनेश गिरी सातत्याने कार्यरत आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडली आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांनी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करून त्यांचा सन्मान केला. या पुरस्काराबद्दल दिनेश गिरी यांनी गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरचे आभार मानले असून, भविष्यातही अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Latur, Latur | Aug 16, 2026

📍दिनेश एस.गिरी चीफ एडिटर महाराष्ट्र न्यूज पोर्टल यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर.

गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने दिनेश एस. गिरी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांनी गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

हा पुरस्कार आज दि 16/8/2026 रोजी भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे.

समाजाच्या वतीने मिळालेला हा सन्मान आपल्यासाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब असल्याचे दिनेश एस. गिरी यांनी यावेळी व्यक्त केले.

📍दिनेश एस.गिरी चीफ एडिटर महाराष्ट्र न्यूज पोर्टल यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर. गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने दिनेश एस. गिरी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांनी गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. हा पुरस्कार आज दि 16/8/2026 रोजी भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. समाजाच्या वतीने मिळालेला हा सन्मान आपल्यासाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब असल्याचे दिनेश एस. गिरी यांनी यावेळी व्यक्त केले.

Latur, Latur | Aug 16, 2026

गंगापूर ग्रामसभेत राडा! भ्रष्टाचाराचे आरोप होताच ग्रामसेवकांनी सभा अर्धवट सोडली

उदगीर तालुक्यातील गंगापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शुक्रवारी चांगलाच गोंधळ झाला.  
ग्रामस्थांनी ग्रामसेवक भाग्यश्री आमले आणि सरपंच जयश्री बिरादार यांच्यावर ग्रामविकास निधीच्या गैरव्यवहाराचे थेट आरोप केले.  

वाद इतका वाढला की ग्रामसेवकांनी सभा सोडून काढता पाय घेतला. संतप्त ग्रामस्थांनी "भ्रष्ट ग्रामसेवकांना हटवा" अशा घोषणा दिल्या.  

पुढील ग्रामसभा आता *20 ऑगस्ट 2026* रोजी होणार आहे. त्यावेळी लेखी उत्तर देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.  

*प्रश्न:* गावाचा विकास करायला बसलेल्यांवरच ग्रामस्थांचा विश्वास नसेल, तर कारभार पारदर्शक कसा होणार? 🤔  

#लातूर #उदगीर #गंगापूर #ग्रामसभा #भ्रष्टाचार #LaturNews #Maharashtra

---

गंगापूर ग्रामसभेत राडा! भ्रष्टाचाराचे आरोप होताच ग्रामसेवकांनी सभा अर्धवट सोडली उदगीर तालुक्यातील गंगापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शुक्रवारी चांगलाच गोंधळ झाला. ग्रामस्थांनी ग्रामसेवक भाग्यश्री आमले आणि सरपंच जयश्री बिरादार यांच्यावर ग्रामविकास निधीच्या गैरव्यवहाराचे थेट आरोप केले. वाद इतका वाढला की ग्रामसेवकांनी सभा सोडून काढता पाय घेतला. संतप्त ग्रामस्थांनी "भ्रष्ट ग्रामसेवकांना हटवा" अशा घोषणा दिल्या. पुढील ग्रामसभा आता *20 ऑगस्ट 2026* रोजी होणार आहे. त्यावेळी लेखी उत्तर देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. *प्रश्न:* गावाचा विकास करायला बसलेल्यांवरच ग्रामस्थांचा विश्वास नसेल, तर कारभार पारदर्शक कसा होणार? 🤔 #लातूर #उदगीर #गंगापूर #ग्रामसभा #भ्रष्टाचार #LaturNews #Maharashtra ---

Latur, Latur | Aug 16, 2026

सर्वसामान्यांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा द्या : माजी मंत्री आ. संजय बनसोडे महाआरोग्य शिबीराचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा उदगीर : माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महा आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे मत माजी मंत्री तथा आमदार आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. उदगीर येथील सामान्य रुग्णालयात आयोजीत माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य शिबीरा प्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड.व्यंकट बेद्रे, माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जि.प. चे बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिरादार,जि. प. सदस्य तथा गटनेते प्रा. दिलीप मटके, मुकेश भालेराव, यमुनाजी भुजबळे, रामराव राठोड, उपनगराध्यक्षा सौ.शितल शिंदे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, उपसभापती विक्की भोसले, न.प. चे गटनेते अनिल मुदाळे, बांधकाम सभापती राजकुमार भालेराव, नगरसेवक बाळासाहेब पाटोदे, शिवकुमार कांबळे, अॅड.वर्षा कांबळे, डाॅ.बालाजी बिरादार, समीर शेख, अमर सुर्यवंशी, नरसिंग शिंदे, व्यंकट बोईनवाड, धनाजी मुळे, इब्राहिम नाना पटेल, अरविंद गिलचे, नवनाथ गायकवाड, पं.स. गटनेते प्रकाश बिरादार, कमलाकर फुले, प्रकाश राठोड, संदिप बिरादार, शफी हाशमी, शंकर रोडगे, पृथ्वीराज पाटील, उर्मिला वाघमारे, वैशाली कांबळे, हुस्ना बानो, शुभम भुमणे, बाबासाहेब सुर्यवंशी, राजु पाटील, सिमा नेत्रगावकर, डाॅ.सुमित होळीकर, डाॅ.सचिन जाधव, डाॅ.पांडुरंग होळीकर, डाॅ.अशोक सारडा, डाॅ.सुमित वाघमारे, डाॅ.सुनिल भागवत, डाॅ.स्वाती सोनवणे, डाॅ.शशिकांत देशपांडे, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. संजय बनसोडे म्हणाले की, स्व.अजितदादा पवार यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्याचे कार्य केले. त्याच प्रेरणेतून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या महा आरोग्य शिबिरातून हजारो नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि आवश्यक उपचारांचा लाभ मिळत आहे. उदगीर हे तीन राज्याच्या सिमेवर असलेले शहर असुन येथे लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात असुन २०० खाटांचे सामान्य रुग्णालय आता ३०० खाटांचे करावे आणि स्वतंत्र १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याची मागणी मी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, नेत्रतपासणी, महिला व बालरोग, कान, नाक घसा तज्ञ, अस्थिरोग तसेच इतर विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. गरजू रुग्णांना आवश्यक औषधांचे वाटप व पुढील उपचारांसाठी तज्ज्ञांकडे मार्गदर्शन करण्यात आले. माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी नागरिकांना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देत, आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक कुटुंबाने निरोगी जीवन जगावे, असेही आ.संजय बनसोडे यांनी सांगितले. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे महा आरोग्य शिबिर सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.श्याम डावळे यांनी केले तर आभार अनिल मुदाळे यांनी मानले. या महा आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक, वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. - Latur News