रामटेक: श्री नागद्वार स्वामी मंडळ रामटेक चे सदस्य नागद्वारला रवाना
Ramtek, Nagpur | Aug 15, 2026 श्री नागद्वार स्वामी आरती बहुउद्देशीय सेवा मंडळ रामटेक तर्फे मध्य प्रदेशातील पचमढी येथील नागद्वार यात्रेकरता मंडळाचे पदाधिकारी सदस्य रामटेक येथून शनिवारला दुपारी रवाना झाले. येथे ते यात्रेकरूंना सेवा देतील. स्थानीय लंबे हनुमान मंदिर येथे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्या हस्ते पूजा अर्चना करून भक्तांचा जत्था रामटेकच्या मुख्य मार्गावरून नागद्वार साठी रवाना झाला.