🛡️ सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२६ 🛡️
डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे ऑक्टोबर महिन्यात विविध ठिकाणी सायबर जनजागृती कार्यशाळा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
🔐 OTP, PIN, CVV व पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.
⚠️ संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
📵 ‘डिजिटल अरेस्ट’ किंवा ‘खाते ब्लॉक’च्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा.
👨👩👧👦 आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक व मुलांनाही सायबर सुरक्षेबाबत जागरूक करा.
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
सतर्क राहा… सुरक्षित राहा!
जळगाव जिल्हा पोलीस दल — नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर. 🇮🇳
#CyberAwarenessMonth #CyberSafety #CyberCrime #JalgaonPolice #सायबरजनजागृती #सायबरसुरक्षा #जळगावपोलीस #1930 #CyberCrimeAwareness
Jalgaon, Maharashtra | Oct 2, 2026