रामटेक: चालकाला पहाटे झोपेची डुलकी मनसर परिसरातील सर्विस रोडवर पलटला कंटेनर
Ramtek, Nagpur | Sep 28, 2026 नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील मनसर परिसरात कंटेनर चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून कंटेनर महामार्गावरून खाली उतरत थेट सर्व्हिस रोडवर पलटी झाल्याची घटना सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात चालक सुरक्षित असून कंटेनरचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. माहितीनुसार, एचआर ५५ ए ९३८३ क्रमांकाचा कंटेनर नागपूरहून जबलपूरच्या दिशेने जात होता.