रामटेक: वनविभाग रामटेक व पत्रकार संघातर्फे वृक्षारोपण; वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज, तालुकाध्यक्ष पंकज चौधरीचे प्रतिपादन
Ramtek, Nagpur | Aug 9, 2026 रविवार दिनांक 9 ऑगस्टला ग्रामपंचायत पंचाळा परिसरात वन विभाग रामटेक व रामटेक तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रामटेक तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पंकज चौधरी यांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करून वृक्षारोपण करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी घेण्याचा संकल्प घ्यावा असे मत व्यक्त केले.