रामटेक: रामटेक येथे माजी सरपंच हिरामण उईकेसह अनेकांचा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे हस्ते शिवसेना प्रवेश
Ramtek, Nagpur | Sep 29, 2026 शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या कार्यप्रणालीवर व विचारांवर प्रेरित होऊन रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत पिंडकापार लोधा येथील माजी उपसरपंच यांच्या सह शेकडो युवक व पुरुषांनी राज्यमंत्री अँड.आशिष जयस्वाल यांच्या रामटेक येथील जसनसंपर्क कार्यालयात एकोणतीस सप्टेंबर रोजी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.