सायबर फसवणुकीपासून सावधान
डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या नवनवीन पद्धतींचा वापर केला जात आहे. डिजिटल अटक, बनावट पार्ट-टाईम जॉब, बनावट गुंतवणूक योजना तसेच OTP फसवणूक यांसारख्या प्रकारांपासून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
🔹 अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे ट्रान्सफर करू नका.
🔹 OTP, UPI PIN, CVV, पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका.
🔹 ऑनलाइन गुंतवणूक किंवा पार्ट-टाईम नोकरीच्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खात्री करा.
🔹 पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे सांगून व्हिडिओ कॉलद्वारे धमकावणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.
मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे नागरिकांना आवाहन —
सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि सायबर गुन्हेगारीला बळी पडू नका!
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क साधा.
#thanepolice #cyberawareness #CyberSafety #cybercrime #digitalarrest