रामटेक: चोर बाहुली वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिर संपन्न
Ramtek, Nagpur | Oct 2, 2026 रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प आणि माधव नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चोरबाहुली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दोन ऑक्टोबरला आयोजित या शिबिरात तीनसे पन्नास चे वर लाभार्थी नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात दृष्टीदोष, मोतीबिंदू तसेच डोळ्यांशी संबंधित विविध आजारांची तपासणी करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी सांगितले.