रामटेक: मंजिरीने जिंकला आपुलकी फाउंडेशन रामटेक द्वारे आयोजित सौभाग्यवती भव: चा प्रथम पुरस्कार, जिंकली सोन्याची नथ
Ramtek, Nagpur | Aug 8, 2026 आपुलकी फाउंडेशन रामटेक द्वारे आयोजित सौभाग्यवती भव: या अनोख्या स्पर्धेच्या पहिल्या मानकरी ठरल्या त्या सौ. मंजिरी महेंद्र येरपुडे.. त्यांनी प्रथम पुरस्काराचा मान स्वीकारत सोन्याची नथ जिंकली. 8 ऑगस्टला किराड समाज भवन रामटेक येथे आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले. या स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार सौ भारती नितेश चौधरी यांना चांदीचा शिक्का तर तृतीय पुरस्कार साक्षी गुलशन चव्हान यांना ट्रॅव्हलिंग बॅग देण्यात आली. या व्यतिरिक्त 25 महिलांना प्रोत्साहन पर पुरस्कार देण्यात आले.