कामठी: नवीन कामठीत ५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
नवीन कामठी परिसरातील रमानगर येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय रतन देवाजी रंगारी यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ ते ४:५० वाजat दरम्यान राहत्या घरी गळफास घेतला.कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे नेले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. जुनी कामठी पोलीस ठाण्यातून मर्ग एमएलसी प्राप्त झाल्यानंतर, मृतकाचा मुलगा सुमित रतन रंगारी याच्या जबाबावरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.