रामटेक: रामटेक इथे कोंबड्याच्या पिंजऱ्यात शिरला ब्राऊन कोब्रा ; एका कोंबडी सहित 12 पिलांना केले फस्त
Ramtek, Nagpur | Sep 22, 2026 रामटेक येथील किट्स कॉलेज रोडवरील आस्था नगरी भागात 22 सप्टेंबरला सकाळी एका घरात थरारक घटना घडली. स्थानिक रहिवासी जगदीश आष्टणकर यांच्या राहत्या घरी असलेल्या कोंबड्याच्या पिंजऱ्यात एक विषारी ब्राऊन कोब्रा शिरल्याचे समोर आले. या नागाने पिंजऱ्यातील एका कोंबडीला मारले आणि तब्बल 12 पिल्लांना जिवंत गिळंकृत केले. सर्पमित्र सागर धावडे यांनी या नागाचे सुरक्षित रेस्क्यू केले.