रामटेक: काँग्रेसचा रामटेक तहसील कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा
Ramtek, Nagpur | Aug 7, 2026 रामटेक, पारशिवनी आणि मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या शासन,प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी,शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सात ऑगस्टला दुपारी एक वाजता च्या दरम्यान लंबे हनुमान मंदिर रामटेक येथून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, खासदार श्याम कुमार बर्वे, माजी आ. चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.