सावनेर: उपविभागीय अधिकारी सावनेर यांना देण्यात आले निवेदन, आमदार यांची स्वाक्षरी
Savner, Nagpur | Aug 14, 2026 मा. महसूल मंत्री ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व चिथावणीखोर वक्तव्यांच्या निषेधार्थ आज मा. उपविभागीय अधिकारी, सावनेर यांना देण्यात आलेल्या निवेदनावर स्वाक्षरी करून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली. जबाबदार लोकप्रतिनिधींबाबत सार्वजनिक जीवनात अशा प्रकारची असभ्य व चिथावणीखोर भाषा वापरणे निषेधार्ह आहे. अशा वक्तव्यांमुळे समाजातील शांतता, सलोखा आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता असते.