भंडारा: लाखनी, तुमसर, मोहाडी व साकोलीत दुष्काळ जाहीर करून धान बोनस त्वरित द्या, महिला संघटनेची मागणी
क्रांतीज्योती महिला संघटनेने लाखनी, तुमसर, मोहाडी आणि साकोली तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना धान बोनस त्वरित देण्याची मागणी मुख्यमंत्रींना निवेदनाद्वारे केली आहे. शेतकरी रोगराई व लहरी पावसामुळे संकटात आहेत.