भोसरीत भीषण अग्निकांड! अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ उभ्या ३ ट्रॅव्हल्स बसेस जळून खाक
#bhosari #travels #fire #news #pcmc
भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या आगीत तीन ट्रॅव्हल्स जळून मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी उभ्या असलेल्या इतर ट्रॅव्हल्सनाही आगीची झळ बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीत नेमके किती नुकसान झाले, तसेच आग कशामुळे लागली, याबाबत अग्निशमन विभागाच्या तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.