भिवापूर: भिवापूर तालुक्यात गावांना भेटी देत मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांचा संवाद
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी यांनी भिवापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत ग्रामस्थ, विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल उंदीरवाडे, तालुका नोडल अधिकारी तथा गट विकास अधिकारी डॉ. चेतन जाधव उपस्थित होते. ग्रामपंचायत तास हद्दीतील मातोश्री पांदणरस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली