भोकरदन: मुठाड येथील देवीच्या मंदिरातील चांदीचा मुकुट चोरणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या आणले भोकरदन पोलीस ठाण्यात
आज दिनांक 30 सप्टेंबर 2026 वार बुधवार रोजी रात्री8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील मोठाड येथे तीन दिवसापूर्वी श्रीदेवी माता मंदिरामध्ये अज्ञात चोरट्यांनी देवीचा चांदीचा मुकुट यासह रोग असे एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात दादाराव आहेर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेतला असून गोकुळ जाधव आणि करण राठोड या दोघांना ताब्यात घेतले,सदरची कारवाई पोलीस निरीक्षक माने व इतर पोलिसांनी केली.