मुख्यमंत्री विजय बनले कंडक्टर! महिलांना दिली तिकिटं, बदल्यात मिळालं चॉकलेट
गांधी जयंतीनिमित्त तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी राज्यातील महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा शुभारंभ केला. यावेळी विजय स्वतः बसमध्ये प्रवासी म्हणून महिलांसोबत बसले.
इतकेच नाही, तर त्यांनी काही वेळ कंडक्टरची भूमिका बजावत महिलांना तिकिटे दिली. टीव्हीके सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना शून्य दराच्या तिकिटावर मोफत बस प्रवास करता येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या तिकिटांच्या बदल्यात काही महिलांनी त्यांना चॉकलेट दिले. मुख्यमंत्री आपल्यामध्ये बसमध्ये उपस्थित असल्याने महिलांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
🚌 मुख्यमंत्री विजय बनले कंडक्टर!
🍫 तिकिटांच्या बदल्यात महिलांनी दिलं चॉकलेट
🎟️ महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा शुभारंभ
😊 महिलांसोबत बसमध्ये बसले मुख्यमंत्री विजय
#JosephVijay #Vijay #TamilNadu #TVK #FreeBusTravel #WomenFreeBus #GandhiJayanti #TamilNaduNews #ViralVideo #PoliticalNews