नागपूर शहर: संतापजनक! कराटे क्लासमध्ये ८ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधम प्रशिक्षक पोलिसांच्या जाळ्यात : अनामिका मिर्झापूरे,
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे यांनी 15 आगस्ट ला दुपारी 12 वाजता दिलेल्या माहितीनुसार, एका कराटे क्लासेसमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.आरोपीने क्लास संपल्यानंतर चिमुरडीला बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर गैरकृत्य केले आणि कोणालाही न सांगण्याची धमकी दिली.पीडित मुलीने घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर, पालकांनी तात्काळ पोलिसांत संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.