जालना: गल्हाटी प्रकल्पात गोदावरीचे पाणी आणण्यासाठी सरकार सकारात्मक:महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; सतीश घाटगे यांचा पुढाकार
Jalna, Jalna | Oct 3, 2026 अंबड तालुक्यातील शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या गल्हाटी प्रकल्पात गोदावरी खोर्याचे पाणी सोडण्याबाबत शासन सकारात्मक असून, यावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या अधिकारांचा वापर करून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. शनिवार दि. 3 ऑक्टोबर 2026 रोजी दु. 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथे आयोजित ‘जनता दरबार’ कार्यक्रमात भाजप नेते सतिष घाटगे उपस्थित होते.