Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

खुलताबाद: होळीच्या दिवशी श्री घृष्णेश्वर मंदिर दर्शनवेळेत बदलःचंद्रग्रहणामुळे चार तास राहणार बंद, सायंकाळी ७ नंतर खुले होणार

बारावे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले घृष्णेश्वर मंदिर येथे ३ मार्च २०२६ (मंगळवार) रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दर्शनवेळेत बदल करण्यात आला आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या चार तासांच्या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असून दुपारी ३ वाजल्यापासून गाभाऱ्यातील प्रवेश व दर्शन थांबवले जाईल. ग्रहणाचा कालावधी दुपारी ३:२० ते सायंकाळी ६:४७ पर्यंत राहणार आहे. धार्मिक परंपरेनुसार ग्रहणकाळात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची प्रथा पाळली जाते.

MORE NEWS