भिवापूर: नवेगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ,बैलावर हल्ला
भिवापूरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव देशमुख शिवारात बिबट्याने बैलावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात शेतकऱ्याचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नवेगाव देशमुख येथील आदिवासी शेतकरी हरिदास जोनबा जांभोडे यांचे पाच एकर शेत आहे. त्यांनी आज सकाळी सुमारे सात वाजता आपल्या बैलजोडीला शेतात बांधून ठेवले.