सेवा संकल्प अभियान व आयुर्वेद दिनानिमित्त गिरोला येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; २०४ ग्रामस्थांनी घेतला लाभ
3.9k views | Gondia, Maharashtra | Sep 29, 2026 सेवा संकल्प अभियान व आयुर्वेद दिनानिमित्त गिरोला येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न;२०४ ग्रामस्थांनी घेतला लाभ गिरोला:आज, दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) कालीमाती अंतर्गत येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिर (AAM) गिरोला येथील ग्राम गिरोला येथे विशेष ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘आयुर्वेद दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावात भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सेवा संकल्प अभियान व आयुर्वेद दिनानिमित्त उपस्थितांना आरोग्यविषयक शपथ देऊन करण्यात आली. यानंतर गावातील नागरिकांची आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत मोफत शारीरिक व विविध आजारांची तपासणी करण्यात आली. मान्यवरांची उपस्थिती: या सेवा संकल्प अभियानास वैद्यकीय अधिकारी मा. जे. एस. उके सर, वैद्यकीय अधिकारी मा. बी. आर. पटले सर (आयुर्वेदिक डिस्पेन्सर, गिरोला), डॉ. राहुल सेवाईवर सर, डॉ. निशांकी रहांगडाले मॅम, डॉ. राम भांडारकर सर, समुदाय आरोग्य अधिकारी टी. एस. येडे मॅम, आरोग्य सेविका कु. डी. एम. फूंडे व कु. तृष्णा उके, आरोग्य सेवक श्री सी. आर. उईके तसेच परिसरातील सर्व आशा सेविकांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य पथकाने रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला व औषधोपचार पुरवले. तपासणी व लाभार्थी आकडेवारी: शिबिरामध्ये एकूण २०४ नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य सेवेचा लाभ घेतला. आरोग्य तपासणीचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे: तपासणी / वर्गवारीसंख्या / रुग्ण एकूण लाभार्थी२०४ असांसर्गिक आजार तपासणी (NCD)१३३, रक्तक्षय तपासणी (HB Test)८९, सिकलसेल तपासणी (Sickle Cell)१२, क्षयरोग संशयित (TB Suspect)०६, गरोदर माता तपासणी (ANC)१५