जालना: पोलिसांना पाहताच तलवार आणि दुचाकी सोडून आरोपी फरार; सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Aug 14, 2026 जालना शहरातील वलीमामु दर्गा परिसरात पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान एका इसमाने पोलिसांना पाहताच दुचाकी आणि त्यावर लावलेली धारदार तलवार सोडून पलायन केल्याची घटना 13 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली. शुक्रवार दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात विजयसिंग भादा, रा. वलीमामु दर्गा, जालना याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.