नागपूर शहर: .बडकस चौकात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन; काँग्रेस नेत्यांच्या विरोधात 'अंत्ययात्रा'
नागपूरच्या बडकस चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एक जोरदार निदर्शन करण्यात आले. या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात आपला तीव्र संताप व्यक्त केला. राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' चा सोनिया गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या कथित अवमानावरून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा निषेध करत त्यांच्या नेत्यांची प्रतिकात्मक अंतयात्रा काढण्यात आली.