Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

म्हसळा: म्हसळा पंचायत समिती कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांची आढावा बैठक

Mhasla, Raigad | Dec 29, 2025
आज सोमवार दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास म्हसळा पंचायत समिती कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रस्तावित आणि प्रलंबित विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी म्हसळा शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने शहराची पाणीपुरवठा, आरोग्य, वीज, रस्ते विकास यासह तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या सुविधांसंदर्भात सखोल चर्चा केली आणि प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी म्हसळा पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.