कुडाळ: सिंधुदुर्गमध्ये दुष्काळ टाळण्यासाठी १-१० ऑक्टोबर दरम्यान जलसंधारण मोहीम
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती व पाणीटंचाई टाळण्यासाठी १ ते १० ऑक्टोबर दरम्यान जलतारा व वनराई बंधारे उभारण्याचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निर्देशांतर्गत मोहीमेचे नियोजन व लोकसहभाग हे या महत्त्वाच्या पाणी संधारण अभियानाचे मुख्य टप्पे आहेत.