सावनेर: नियमबाह्य सिमेंट ब्रेकर मुळे अपघाताचे सत्र खापरखेडा ते भानेगाव हनुमान मंदिर दरम्यान तीन ठिकाणी स्पीड ब्रेकर
Savner, Nagpur | Sep 25, 2026 पोलीस स्टेशन खापरखेडा पासून भानेगाव हनुमान मंदिर पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट असतात करण्यात आलेल्या तीन सिमेंट स्पीड ब्रेकर मुळे गेल्या तीन दिवसात दुचाकी अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे दररोज सरासरी दोन ते तीन अपघात या रस्त्यावर होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली या रस्त्यावरच्या स्पीडब्रेकरची रचना नियमबाह्य असून ते उंच अचानक आणि योग्य सूचनाफलकांशिवाय बनविण्यात आलेले आहे