काटोल: कोंढाळी पोलिसांची धडक कारवाई; विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणारे तीन जण जाळ्यात
Katol, Nagpur | Sep 30, 2026 कोंढाळी पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी अडेगाव येथे सापळा रचून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली.नाकाबंदीदरम्यान एका दुचाकीवरून अवैध दारू नेली जात असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत पोलिसांनी ७२ विदेशी दारूच्या निपा आणि मोटार सायकल असा एकूण ६४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कैलास निमदेव वाघधरे, विकी ज्ञानेश्वर ढवळे आणि विजय जयस्वाल या तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.