गाडी गेली तरी पोटातलं पाणी हलत नाही! छत्रीचा माईक अन् शाळकरी मुलींचं भन्नाट ग्राऊंड रिपोर्टिंग
रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील रस्त्यांची दुरवस्था दाखवण्यासाठी शाळकरी मुलींनी चक्क छत्रीचा माईक बनवत अनोखं ग्राऊंड रिपोर्टिंग केलं. पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. “रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता?” असा सवाल करत मुलींनी प्रशासनाचं लक्ष वेधलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
#SchoolGirls #MaharashtraNews #MarathiNews #LatestNews #ViralNews #vedioviral
Dharashiv, Dharavshiv | Aug 9, 2026