सावंतवाडी: सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लूप लाईन जागेवर प्रशासकीय इमारत बांधणीचा वाद
सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसच्या विस्तारासाठी राखीव असलेल्या लूप लाईन जागेवर प्रशासकीय इमारतींचे नियोजन होत असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने विरोध केला आहे. या इमारतीमुळे भविष्यात प्लॅटफॉर्म वाढीचा मार्ग कायमचा बंद होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.