काटोल: काटोल शहरावर पाणीटंचाईचे सावट: रिधोरा डॅममध्ये अपुरा पाणीसाठा!
Katol, Nagpur | Oct 1, 2026 पाणीपुरवठा सभापती सुभाषजी कोठे आणि शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती विजय महाजन यांनी रिधोरा डॅमला भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली. काटोल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या डॅममध्ये सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध नाही.पाण्याचा तुटवडा लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करावा, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे. >