भोकरदन: राजुर येथे अंगारिका चतुर्थी निमित्त माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी घेतली राजुरेश्वराचे दर्शन
आज दिनांक 29 सप्टेंबर 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 12वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजुर येथे अंगारिका चतुर्थी निमित्त भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राजुरेश्वराची मनोभावे दर्शन घेत पूजा अर्चना केली आहे याप्रसंगी त्यांच्यासोबत जालनाच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अशीमा मित्तल या सुद्धा उपस्थित झाल्या होत्या मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांचा सुद्धा प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.