जालना: श्री गजानन महाराज पालखीचे जालना शहरात आगमन; जागोजागी उत्स्फूर्त स्वागत
Jalna, Jalna | Aug 9, 2026 पंढरपूर येथील आषाढी एकादशीची वारी पूर्ण करून शेगावच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचे आज जालना शहरात आगमन झाले. पालखीच्या आगमनामुळे शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जागोजागी भाविकांकडून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पालखी जालना शहरात दाखल होताच नगरसेवक दुर्गेश काटीवाले यांच्यासह परिसरातील नागरिकांनी विविध ठिकाणी पालखीचे स्वागत केले. भाविकांनी श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले तसेच वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.