जालना: उद्यापासून जालना सिटी बसला हिरवा कंदील
तीन मार्गांवर साध्या बस धावणार; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा
Jalna, Jalna | Sep 20, 2026 जालना | प्रतिनिधी जालना शहरातील बहुप्रतीक्षित सिटी बस सेवा अखेर उद्यापासून सुरू होणार आहे. जालना बस आगाराचे प्रमुख अजिंक्य जैवळ यांनी ही माहिती दिली. सिटी बस सेवेसाठी शहरात तीन बसचे नियोजन करण्यात आले असून, या बस विविध महत्त्वाच्या मार्गांवर धावणार आहेत. उद्या सकाळी १० वाजता जालना बस स्थानक येथे शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवून सिटी बस सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे जालना शहरातील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना