*जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे तीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा यशस्वी शुभारंभ*
63 views | Sindhudurg, Maharashtra | Aug 9, 2026 *जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे तीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा यशस्वी शुभारंभ* महाराष्ट्र शासनाच्या कुपोषण निर्मूलन व संसर्गजन्य आजार नियंत्रण टास्क फोर्सचे अध्यक्ष *मा. डॉ. दीपक सावंत* यांच्या सूचनेनुसार तसेच आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे व उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *तीव्र कुपोषित (SAM)* बालकांसाठी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील *पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये (NRC)* विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.