नागपूर शहर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण
स्वातंत्र्य दिन हा आपणा सर्वांसाठी गौरवाचा आणि उत्सवाचा दिवस असून, इतक्या त्याग आणि परिश्रमाने मिळालेले स्वातंत्र्य कायम ठेवून जे सर्वोत्तम आहे, ते आपल्या देशात यायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नागपुरातील महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील डॉ. हेडगेवार भवन येथे सरसंघचालकांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण पार पडले.