शेळगाव थंडी येथे गणेशोत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न
1k views | Nanded, Maharashtra | Sep 17, 2026 नांदेड (धर्माबाद): धर्माबाद तालुक्यातील शेळगाव थंडी येथे श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून आरोग्य वर्धिनी केंद्र मेंगनाळी व प्राथमिक आरोग्य केंद्र सिरूर दाभाड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ग्रामस्थांची रक्तदाब, मधुमेह व इतर आजारांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी या आरोग्य सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.