जालना: पुणेगावात अंभोरे महाराजांच्या कथित त्रासाला कंटाळून पारधी समाजातील महिलेने घेतले औषध
Jalna, Jalna | Aug 16, 2026 जालना तालुक्यातील पुणेगाव येथे गायरान जमिनीच्या वादातून पारधी समाजातील महिलेला काही दिवसांपूर्वी बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पारधी समाजाच्या महिलेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक झालेली नसल्याचा आरोप पारधी समाजाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असतानाच, पुणेगाव येथील अंभोरे महाराज यांच्याकडून पारधी समाजाला गायरान जमीन खाली करण्यासाठी त्रास दिला जा