जालना: जुन्या जालन्यात कत्तलीच्या उद्देशाने गोवंश डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका; कदीम जालना पोलिसांची कारवाई
Jalna, Jalna | Oct 3, 2026 जुन्या जालना शहरातील युसुफ कॉलनी परिसरात गोवंशीय जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे डांबून ठेवल्याचा प्रकार कदीम जालना पोलिसांच्या कारवाईत समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी सईद शकिल कुरेशी (वय 25, रा. कुरेशी मोहल्ला, जुना जालना) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. पोलिसांच्या कारवाईत चार गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, त्यांची एकूण किंमत 25 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शनिवार दि. 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस सुत्राकडून ही माहिती मिळाली.