बदनापूर: दुष्काळाची आर्थिक मदत तात्काळ मिळावी या मागणीसाठी शेतकरी पुत्राने ढोल वाजवत केले आंदोलन
आज दिनांक 1आक्टोंबर 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर तहसील कार्यालयासमोर बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील सौरभ काळे या शेतकरी पुत्राने ढोल वाजवत आंदोलन केले आहे व या त्याने मागणी केली आहे की सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे मात्र अद्यापही माझ्या आई-वडिलांना व इतर शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळाला नाही त्यामुळे सण-उत्सव व माझ्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यामुळे सरकारने तात्काळ योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करत या तरुणांन हे आंदोलन केले आहे.