नागपूर शहर: यशोधरानगर पोलिसांची कामगिरी: एम.डी. पावडर बाळगणारे तीन आरोपी अटकेत
16 ऑगस्ट ला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यशोधरानगर पोलिसांनी सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले.आरोपींकडून २८.६९ ग्रॅम एम.डी. पावडर, ३ मोबाईल आणि होंडा एक्टिवा मोपेड असा एकूण ३,१८४५० रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला.आरोपी रितीक हमेदास उपवंशी, पियुष उमेश वाघ आणि देवांग विजय सोनारे अशी आरोपींची नावे आहेत.आरोपींविरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.